• पुनरुत्थान समरसता गुरुकुलम संस्थेला मिळणार पाच कोटी रुपयांचा निधी; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

  पुनरुत्थान समरसता गुरुकुलम संस्थेला मिळणार पाच कोटी रुपयांचा निधी; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

  दर्जेदार शिक्षणातून दर्जेदार रोजगार मिळेल – नितीन गडकरी

  पिंपरी (Pclive7.com):- पुनरुत्थान समरसता गुरुकुलम संस्थेला केंद्रीय मंत्रालयाकडून सीएसआर अंतर्गत पाच कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. तसेच पुनरुत्थान समरसता गुरुकुलम मधून मिळत असलेले शिक्षण अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण करून त्यातून दर्जेदार रोजगारांची निर्मिती होईल, असा विश्वास देखील गडकरी यांनी व्यक्त केला.

  रस्ते वाहतूक व महामार्ग जल वाहतूक व जहाज बांधणी नदी विकास व गंगा पुनरुत्थान विभागाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम ला भेट दिली. यावेळी डिजिटल सायन्स लॅबचे त्यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. तसेच कुर्डुवाडी भागातील दहा आदिवासींना

  Read More
 • लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पिंपळे सौदागर ते पुणे मनपा ‘तेजस्विनी’ बससेवा सुरू होणार

  लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पिंपळे सौदागर ते पुणे मनपा ‘तेजस्विनी’ बससेवा सुरू होणार

  पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पिंपळे सौदागर ते पुणे मनपा तेजस्विनी बससेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दिली.

  पिंपळे सौंदागरचा ‘स्मार्ट सिटी’मध्ये समावेश करण्यात आला. परंतु पिंपळे सौदागर ह्या क्षेत्रामध्ये ७० टक्के लोकसंख्या ही आयटी क्षेत्रातील नोकरदार वर्ग असून यामध्ये महिला नोकरदार वर्गाचा ही मोठा समावेश आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळा मार्फत फक्त महिलांसाठी तेजस्विनी ही बस सुरू करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी केली होती. तसा प्रस्ताव पीएमपीएमएलच्या वाहतूक व्यवस्थापक विभागाकडे पाठवला होता.

  शत्रुघ्न काटे यांच्या प्रयत्नांना आता खऱ्या अर्थाने यश मिळाले आहे. आमदार लक्ष्मण जगताप

  Read More
 • खेळांमुळे मुलांना मानसिक कणखरता मिळते – लक्ष्मण जगताप

  खेळांमुळे मुलांना मानसिक कणखरता मिळते – लक्ष्मण जगताप

  मोरया युथ फेस्टिव्हलची उत्‍साहात सांगता

  पिंपरी (Pclive7.com):- खेळांमुळे मुलांना मानसिक कणखरता मिळते. पालकांनी मुलांना विविध क्रीडाप्रकार शिकण्यासाठी प्रेरणा द्यावी. यामुळे देशाला चांगले, नैपुण्यवान खेळाडू मिळतील. कर्तव्य फाऊंडेशनने आयोजित केलेल्या ‘मोरया युथ फेस्टिव्हल’ मधील विविध क्रीडा स्पर्धांना पहिल्याच वर्षी ४ हजार खेळाडूंचा प्रतिसाद मिळाला. ही बाब नोंद घेण्यासारखी आहे, असे मत पिंपरी चिंचवड शहर भाजपाचे अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्‍त केले. यावेळी पहिला ‘मोरया चॅम्पियन्स’ चषक उत्कृष्ट सांघिक कामगिरी करणाऱ्या पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाने पटकावला.

  पिंपरी चिंचवडमध्ये शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण या क्षेत्रात सामाजिक उपक्रम राबविणारी कर्तव्य फाऊंडेशन ही अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेच्या वतीने शहरातील युवक

  Read More
 • सांगवीत उत्साही वातावरणात श्रीमहालक्ष्मी देवीची प्राणप्रतिष्ठा

  सांगवीत उत्साही वातावरणात श्रीमहालक्ष्मी देवीची प्राणप्रतिष्ठा

  पिंपरी (Pclive7.com):- शुभ्र कुर्ता-पायजमा, डोईवर भगवी टोपी आणि उत्साह आणि भक्तिपूर्ण वातावरणात नवी सांगवीत श्री महालक्ष्मी सेवा भावी ट्रस्टच्या वतीने श्री महालक्ष्मी प्राणप्रतिष्ठानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. ढोल, ताशांचा दणदणाट….संबळ, सनई पारंपरिक वाद्याचा सुमधूर आवाज…भक्तांकडून पारंपरिक वेशभूषा परिधान करून लेझिम, झांज व ढोल पथकाचे बहारदार प्रदर्शन…भव्य शोभायात्रा पाहण्यासाठी आबालवृद्धांची झालेली गर्दी, अशा उत्साही वातावरणात शानदार मिरवणूक काढून श्री महालक्ष्मी देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

  नवी सांगवीतील श्री महालक्ष्मी सेवा भावी ट्रस्टच्यावतीने 12 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत श्री महालक्ष्मी प्राणप्रतिष्ठा सोहळा, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा शोभायात्रेचा शुभारंभ उदयोजक विजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार लक्ष्मण
  Read More
 • 1
 • 2
 • 3
 • 4
 • Default
 • Title
 • Date
 • Random
load more hold SHIFT key to load all load all