• शिवस्मारक भूमिपूजनासाठी इंद्रायणी, पवना, मुळा-मुठाचे जल नेणार

  शिवस्मारक भूमिपूजनासाठी इंद्रायणी, पवना, मुळा-मुठाचे जल नेणार

  शिवस्मारकाच्या भूमिपूजनात पिंपरी चिंचवड भाजपाचाही सहभाग


  पिंपरी (दि. 21 डिसेंबर 2016) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होऊन दोन वर्षे झाली. मुंबईमध्ये राजभवन जवळील समुद्रात जागतिक दर्जाचे श्री छत्रपती शिवाजी महाराजारांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन पक्षाने दिले होते. त्या आश्वासनपुर्तीचा मंगलक्षण शनिवारी (दि. 24 डिसेंबर) शिवस्मारकाच्या भूमिपूजनाने देशभर मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
  शनिवारी (दि. 24 डिसेंबर) दुपारी 1 ते 4 यावेळी मुंबईतील राजभवन नजीकच्या समुद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या जागतिक दर्जाच्या शिवस्मारकाचे भूमिपूजन होणार आहे. याप्रसंगी देशभरातील प्रमुख नद्यांचे जल आणि मृदा (माती) मंगलकलशातून आणण्यात येणार आहे. भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर

  Read More
 • संदीप वाघेरे यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

  संदीप वाघेरे यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

  पिंपरी (दि. 20 डिसेंबर 2016)

  पिंपरी गावातील युवा उद्योजक व भाजपचे कार्यकर्ते संदीप बाळकृष्ण वाघेरे यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप व लोकलेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटर्वधन यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
  यावेळी भाजपा गटनेत्या वर्षा मडेगिरी, नगरसेविका सिमा सावळे, आशा शेंडगे, भाजपा प्रदेश सदस्य व माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, भाजपा शहर सरचिटणीस महेश कुलकर्णी, राजेश पिल्ले, बाबू नायर, प्रमोद निसळ, माजी नगरसेवक राजू दुर्गे, राहुल जाधव, शांताराम भालेकर आदी उपस्थित होते.
  पिंपरी गावाच्या विकासासाठी युवा उद्योजक संदीप वाघेरे यांच्यासारख्या कार्यकर्त्याला पिंपरी चिंचवड महापालिकेवर मतदारांनी निवडून पाठवावे असे आवाहन यावेळी आमदार

  Read More
 • निवडणूकीची पहिल्या टप्प्यातील नियोजनाची तयारी पुर्ण - आ. लक्ष्मण जगताप

  निवडणूकीची पहिल्या टप्प्यातील नियोजनाची तयारी पुर्ण - आ. लक्ष्मण जगताप

  पिंपरी (दि. 20 डिसेंबर 2016)

  पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीची पहिल्या टप्प्यातील नियोजनाची तयारी पुर्ण झाली असून हि निवडणूक भारतीय जनता पार्टी पुर्ण ताकतीने लढणार आहे. अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या निवडणूकीसाठी एकूण 32 प्रभाग आहेत. या सर्व प्रभागात समन्वय साधण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाच्या नियंत्रणाखाली 18 समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यामध्ये निवडणूक संचलन समिती प्रमुख, निवडणूक संचलन समिती सहायक, निवडणूक संचलन समिती बूथ प्रमुख, निवडणूक संचलन समिती निधी प्रमुख, कार्यालय सहाय्यक, विकासनामा प्रमुख, आरोपपत्र प्रमुख, साहित्य निर्मिती प्रमुख, समाज मेळावे प्रमुख, परिवार संपर्क प्रमुख, सभा आणि कोपरा

  Read More
 • मतदार राजा भाजपावर विश्वास व्यक्त करीत आहे - सदाशिव खाडे

  मतदार राजा भाजपावर विश्वास व्यक्त करीत आहे - सदाशिव खाडे

  पिंपरी (दि. 15 डिसेंबर 2016)

  आज जाहीर झालेल्या नगरपालिकेच्या निवडणूक निकालात भारतीय जनता पार्टीने तळेगाव, लोणावळासह आळंदी नगरपालिकेत देखील यश मिळविले. हे केंद्र आणि राज्य सरकारवर जनतेने दाखविलेल्या विश्वासाचे प्रतिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या लोकउपयोगी निर्णयामुळे मतदार राजा भाजपावर विश्वास व्यक्त करीत आहे. भाजपाच्या विजयाची लाट आता पिंपरी चिंचवड महापालिका जिंकल्याशिवाय थांबणार नाही, असे प्रतिपादन भाजपा प्रदेश सदस्य सदाशिव खाडे यांनी केले.
  आज पुणे आणि लातूर जिल्ह्यातील नगरपालिकांचे निवडणूक निकाल जाहीर झाले. यामध्ये तळेगाव, लोणावळा आणि आळंदी नगरपालिकेत भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले. लातूर जिल्ह्यातील उदगीर आणि औसा नगरपालिकेत देखील भाजपाचे नगराध्यक्ष निवडून आले.

  Read More
 • 1
 • 2
 • 3
 • 4